अर्जुनी मोरगांव :* तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना/बाक्टी येथे ता.३१ जानेवारी २०२५ रोजी जि.प अध्यक्ष लायकराम भेंडारकर गोंदिया यांनी सदिच्छा भेट दिली असता यावेळी प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन कुलसुंगे आणि त्यांचे आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना तर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी लायकराम भेंडारकर यांची नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ व शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आप-आपली जबाबदारी काळजीपूर्वक चांगल्याप्रकारे पार पाडावी आलेल्या नागरीकांना व रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन योग्य प्रकारे उपचार दयावा असे जि.प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडताना सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथील वयोमान आरोग्य सहायिका इंदिरा बोरकर यांचा सेवानिवृत्तीपर जि.प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते शालश्रीफळ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
याप्रसंगी पं.स सदस्य कुंदाताई लोगडे अर्जुनी मोर, सरपंच सचिन डोंगरे, खरेदी विक्री संचालक पंढरी लोगडे अर्जुनी मोर, माजी अध्यक्ष से.सह.सोसायटी कुसन झोळे बोंडगांव देवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन कुलसुंगे, महेश लोगडे, आदी आरोग्य कर्मचारी व गावातील नागरीक उपस्थित होते.