गोंदिया,दि.०१- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा महिला आणि शेतकरी यांच्याविकासाकरीता महत्वाचा ठरला आहे.सोबतच महिलांना उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या योजना ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाकरीता असल्याची प्रतिक्रिया गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष व भाजप महिला मोर्चा प्रदेश महामंत्री श्रीमती रचना गहाणे यांनी व्यक्त केली आहे.श्रीमती गहाणे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासकडे वाटचाल करीत असल्याचे सांगंत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानावर भर, रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावले या अर्थसंकल्पात टाकून सर्वसमावेशक विकासावर भर दिल्याचे म्हटले आहे. महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवी योजना यामुळे गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत.50 लाख शाळांमध्ये अटल टीकरिंग लॅब्स, या गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचून ग्रामीण भागातील शाळातील मुलांना चांगले शिक्षण मिळणार असल्याचेही म्हटले आहे.