राजा भोज यांना बहुजन समाज पक्षाचे अभिवादन

0
136

गोंदिया ता. 3:- न्यायप्रिय चक्रवर्ती राजा भोज यांच्या जयंती प्रित्यर्थ बहुजन समाज पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलं..
न्यायप्रिय राजा भोज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना बसपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र मेश्राम
(स्टडी पॉईंट ) म्हणाले की, राजा भोज हे बलाढ्य आणि शूरवीर असल्यामुळे त्यांच्या राजवटित अफगाणिस्तानचा आक्रमणकारी गजनविला पाय ठेवता येऊ शकला नाही आणि गजनविला पळवून लावलं . ते पुढे म्हणाले की, राजा भोज
हे, सम्राट अशोकांसारखे सदाचारी होते.सम्राट समुद्रगुप्त सारखे साहित्यिक,आणि सम्राट विक्रमदित्य सारखे शूरवीर होते.ते न्यायी होते आणि प्रजेच्या सुख समृद्धीची त्यांना जोरदार जाणीव होती.
यावेळी बहुजन समाज पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष सुनील भरणे,डॉ आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष अनंत टेम्भूरकर, सुशील गणवीर,नरेंद्र मेश्राम, एन. एल. मेश्राम,पंकज नागदेवे, नूरलाल उके, अनिल मौर्या, मनोज खोब्रागडे, सुनील मेश्राम आदिनी राजा भोज यांना आदरांजली वाहिली.