एम. जी. पैरामेडिकल काॅलेज मध्ये राजा भोज जयंती साजरी

0
74

गोंदिया, दि.०३–स्थानिय एम. जी. पैरामेडिकल काॅलेज मध्ये राजा भोज जयंती साजरी करण्यात आली़ यावेळी राजा भोज यांच्या जिवनाविष़य़ी माहीती देताना भोज हे 1010 पासून 1055 त्याच्या मृत्यूपर्यंत मालव्याचे राजा होते.राजा भोजने आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात जवळपास सर्व शेजार्यांशी युद्धे केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात यश मिळाले. त्याच्या शिखरावर, त्याचे साम्राज्य उत्तरेकडील चित्तोडपासून दक्षिणेकडील वरच्या कोकणापर्यंत आणि पश्चिमेकडील साबरमती नदीपासून पूर्वेला विदिशापर्यंत पसरले होते असे प्रतिपादन प्रा. मनिष चैधरी यांनी केले़एम. जी. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये दि. 03.02.2025 ला आयोजित राजा भोज महाराजांच्या जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सूत्रसंचालन विध्यार्थी प्रतीनिधी कु. षिवानी बघेले यांनी व कार्यक्रमाचे आभार प्रदर्षन प्रा. रामेष्वरी पटले यांनी केले. कार्यक्रमाला काॅलेजचे संचालक श्री अनिल गोंडाने, प्राचार्या. अनुसया लिल्हारे, प्रा. प्रिती वैद्य, प्रा. छाया राणा, प्रा. रामेष्वरी पटले, प्रा. आरती चैधरी, प्रा. गायत्री बावनकर, श्री राजू रहांगडाले, श्री सौरभ बघेले, श्री राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेष्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.