खा.पडोळेंकडे समृद्धी एक्सप्रेसवे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या दिल्लीत जात व्यथा

0
24

गोंदिया,दि.०५: गोंदिया जिल्ह्यातून जात असलेल्या नागपूर-गोंदिया समृद्धी एक्सप्रेसवेच्या बांधकामाला घेत तिरोडा तालुक्यातील शेतजमिनी एक्सप्रेसवे मध्ये जात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकरी संघर्ष समिती शिष्टमंडळाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे याची दिल्ली येथे भेट(दि.०३) घेत आपल्या व्यथा मांडल्या.या शिष्टमंंडळाचे नेतृत्व रमेश राहांगडाले,कुमुद पटले आणि सतीश राहांगडाले यांनी केले.

या बैठकीत शिष्टमंडळाने नागपूर-गोंदिया समृद्धी एक्सप्रेसवे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करीत मागण्यांचे निवेदन खासदार पडोळे यांना सादर केले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी, जमीन संपादन आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवर चर्चा केली.यावर खासदार पडोळेनीनी हा प्रश्न संसदेत उपस्थित करीत सरकारचे लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले.शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.तसेच, भविष्यात जर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासली, तर त्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.