गोंदिया,दि.०५ः- स्वनाम धन्य नेता स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या जयंती निमित्त ९ फेब्रुवारी ला डी.बी.सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित गोंदिया भंडारा जिल्हयातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोहाचे उदघाटक म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार प्रफुलभाई पटेल हे राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून जुबिलेंट लाइफसायंसेजचे प्रबंध निदेशक हरी भरतीया, माजी खासदार नरेश गुजराल, उद्योजक मोहित गुजराल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर समारोहाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय येथे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकित केले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, शहर महिला अध्यक्ष माधुरी नासरे प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीला आशा पाटील, कुंदा पंचबुद्धे, कुंदा दोनोडे, शर्मिला पाल, रुचिता चव्हाण, संगीता माटे, पुस्मोतकला माने, निका सोनवाने, विश्रांती थुलकर, पंचशीला मेश्राम, पायल भेलावे, संध्या गोंडाणे, नीता मुलचंदानी, दीपाताई, वर्षा बडगुजर, जया खंडेलवाल, मनीषा गौतम, धनवंता गौतम, हस्तकला घरे, वर्षा ठाकूर, सोनू चिमोटे, ज्योती जनवारे, बबिता दीप, आराधना कुशमाटे, दामिनी कूशमारे, ममता कुमार, संगीता आम्बेडारे, सरोज सिंगनधुपे, राधिका कोहले, कविता सूर्यवंशी, सुनीताताई, सरला मस्के, रेखा चावडा, पुष्पा हर्षे, उमा सिंग, सरिता ब्रम्हे, अंकिता जनवारे, हिना जनवारे, सुनीता देशमुख, माधुरी परमार, सोनम मेश्राम, कुंदाताई पंचबुद्धे सहित महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.