*=आमदार राजकुमार बडोले यांनी केली पहाणी
अर्जुनी-मोर.-– ऐतिहासिक तिर्थक्षेत्र प्रतापगड महाशिवरात्री यात्रा, व ऐतिहासिक दर्गा येथे 26 फेब्रुवारीपासून महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा सुरु होत आहे.यानिमित्त भोलेनाथाचे दर्शन, व दर्ग्यावर माथा टेकण्यासाठी लाखो भाविक येतात.यात्रेला येण्यासाठी लाखो भावीक एकमेव मुख्य मार्ग अर्जुनी – सुकळी / खैरी मार्गे प्रतापगडला जातात.यावर्षी यात्रेपुर्वीच सुकळी ते गोठणगाव- प्रतापगड मार्गापर्यंत रस्ता दुरुस्तीचे मोठे काम सुरु असल्याने सिडीवर्क व रस्ता खोदकाम झाले असल्याने प्रतापगड यात्रेवर रस्त्याचे संकट निर्माण झाले आहे.या विभागाचे आमदार राजकुमार बडोले यांनी नुकतीच सदर रस्त्याची पहाणी केली असता रस्ता बांधकामाविषयी तिव्र नाराजी व्यक्त करुन त्यांनी या संबंधाने जिल्हाधिकारी व महाराष्ट राज्य पायाभूत सुविधा महामंडळ यांचे कडे तक्रार केली असुन प्रशस्त व दर्जेदार रस्ता तयार व्हावा या संबंधाने विशेष लक्ष घालण्याची सुचना केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे माध्यमातुन धाबेटेकडी- अर्जुनी-मोर- सुकळी- गोठणगाव ह्या राज्य मार्गाचे मजबुतीकरणाचे काम मंजुर आहे.सध्या ह्या मार्गाचे बांधकाम सुकळी-ते प्रतापगड फाटा गोठणगाव पर्यंत सुरु करण्यात आले आहे.हा मार्ग सन 1980 पूर्वीचा राज्य मार्ग आहे.राज्य मार्ग हा साडे सात मीटरचा असावा.हा रस्ता सध्या डांबरीकरणाने प्रसस्त आहे.हा जेवढा रस्ता आहे तेवढा बनायला पाहिजे.मात्र या रस्त्याला जेवढे सिडीवर्क तयार होत आहेत ते साडेतीन मीटरचे बनत असल्याची शंका आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली असून रस्ता ही साडेतीन मिटर रुंदीचा तर बनणार नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे.हा रस्ता जंगलातून जात असल्याने वणविभागाची परवानगी घेण्यात आली आहे.का? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक प्रतापगड महाशिवरात्री यात्रा व उर्स शरिफ यात्रा 26 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.लाखो भावीक प्रतापगड ला याच रस्त्याने भोलेनाथाचे दर्शनासाठी व दर्ग्यावर माथा टेकण्यासाठी जातात. याच मार्गाने हजारो वाहणाची वर्दळ असते.गोठणगाव पर्यटन व धार्मीकस्थळ प्रतापगड असल्याने बारमाही पर्यटक व भावीक याच रस्त्यांनी जातात.सुकळी पासुन गोठणगाव पर्यंत सिडीवर्क चे काम सुरु असुन या बारमाही रहदारीच्या रस्त्यावर सर्वत्र मातीचे ठिगारे व ईतर निरुपयोगी साहित्य अस्ताव्यस्त पसरले असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.तर सुकळी पासुन संपुर्ण रस्ता खोदकाम झाला असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.त्यामुळे ऐतिहासिक प्रतापगड यात्रेवर रस्त्याचे संकट निर्माण झाले आहे.यात्रेच्या काळात या रस्त्यावरुन मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.तेव्हा जिल्हा प्रशासन तथा महाराष्ट्र राज्य पायाभूत महामंडळ यांनी त्वरीत रस्त्याची पहाणी करुन कुठल्याही भाविकांवर आपत्ती येवु नये अशी सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे.तसेच बारमाही वाहतुकीच्या दृष्टीने सदर रस्ता व सिडीवर्क साडेसात मिटर पेक्षा जास्त रुंद बनवुन प्रसस्त व मजबुत रस्ता बनावा असी मागणीवजा सुचना आमदार राजकुमार बडोले यांनी जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे केली आहे.