अर्जुनी मोर.,दि.०९ः डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनात त्यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांचे विशेष योगदान आहे.वयाचे नवव्या वर्षी लग्न झालेल्या रमाईने भिमराव आंबेडकरांचा संसार फुलविला,रमाबाई ने बाबासाहेबांना संसाराच्या कटकटीपासुन दुर ठेवुन त्यांना ध्येयप्राप्तीसाठी प्रोत्साहित केले. खुद्द डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहीले की सामान्य भिमाचे डाॅ.आंबेडकरांमधे रुपांतर करण्याचे श्रेय रमाईला जाते.त्यामुळे समाजातील प्रत्येक महीलांनी रमाई चा आदर्श ठेवुन जगले पाहीजे.कारण रमाई त्याग आणी समर्पणाची मुर्ती असल्याचे प्रतिपादन माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव/बांध येथे बुद्ध विहाराच्या प्रांगणात मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे बोलत होते.सर्वप्रथम माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे होते.मुर्तीदाता सौ.कमलाताई चवरे यांनी बु. अरविंद चवरे यांच्या स्मुर्तीपितर्थ सिरेगाव/बांध येथे बुद्ध विहारात मुर्तीदान दिले.
याप्रंसगी आम्रपाली डोंगरवार सभापती पं. स. अर्जुनी मोरगाव, पुष्पलता दृगकर पं.स. सदस्य, सागरताई चिमणकर सरपंच, हेमकृष्ण संग्रामे उपसरपंच , डॉ. सुगत चंद्रिकापुरे, मनोहर चिमणकर, यशवंत कुंभरे, अमिता खोब्रागडे, देवानंद चिमणकर, प्रकाश सुखदेव, लाडे सर समता सैनिक दल, मंजुषा चंद्रिकापुरे, मालती दहीवले, दिव्या चंद्रिकापुरे, दामोधर गहाणे, कविता चवरे, अनिकेत चवरे, पायल चवरे, केशव गजभिये, विकास गजभिये, महेश सुखदेव सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक व संचालन श्री. कापगते यांनी केले.जयंती समारोहाला ग्रामवासी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.