गोंदिया,दि.११ः- जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय आरोग्यविषयक आढावा सभा नागपूर विभागीय उपसंचालक आरोग्य सेवा डॉ.शशिकांत शंभरकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.त्या वेळेस जिल्हास्तरिय आढावा सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे जिल्हा शल्यचिकित्सक ,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ,युएनडीपी प्रोजेक्ट अधिकारी अश्विनी नागर उपस्थित होते.
दि.10 फेब्रुवारी रोजी नागपूर विभागीय उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर यांनी गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेतला.त्यावेळेस जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम योजनाचे जिल्हा समन्वयंक यांचा आढावा घेवुन मार्गदर्शन केले.
आढावा सभेदरम्यान सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जसे माता व बाल संगोपन, हिवताप,क्षयरोग,कुष्ठरोग,सिकलसे
आढावा सभेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी,डॉ.ललित कुकडे,डॉ.निलेश जाधव,डॉ.अमित खोडनकर,डॉ.सुकन्या कांबळे,डॉ.प्रणित पाटील तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय माहुले,डॉ.खुशबु महानंदीया,डॉ.नंदा गेडाम,डॉ.पुरुषोत्तम पटले,डॉ.प्रशांत तुरकर,डॉ.राहुल शेंडे,डॉ.सचिन उईके,डॉ.गगन गुप्ता,डॉ.आशिश नाईक, डेमो विजय आखाडे उपस्थित होते.