गोंदिया,दि.१२ः राज्य परिवहन महामंंडळातर्फे चालविल्या जात असलेल्या बसेस अनेकदा रस्त्यातच बंद पडत असल्याचे चित्र अनेकदा बघावयास मिळते.त्यातच आज १२ फेब्रुवारीला गोरेगाव तालुक्यातील कुर्हाडी येथे दुपारी १.२० वाजेच्या सुमारास गोरेगाव-तिरोडा बस क्र. एमएच 40 – एन 9507 ही बंद पडल्याने प्रवाशांना धक्का मारुन त्या बसला रस्त्याच्या कडेला करावे लागल्याचे चित्र बघावयास मिळाले.बस बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.सदर बस ही गोरेगाव येथून तिरोडा जाण्याकरीता निघालेली असतांना कुर्हाडी येथे पोचताच बंद पडली.मुख्य रस्त्यावरच बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.