गोंदिया 17 :- गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री हे 18 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे आगमन. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे राखीव. दुपारी 2 वाजता गोंदिया येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभाग, सहकार विभाग व खनिकर्म विभागाचा आढावा घेतील. सायंकाळी 5 वाजता पोलीस मुख्यालय, प्रेरणा सभागृह, कारंजा येथे पोलीस परिवारांसोबत संवाद कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता गोंदिया येथून शासकीय वाहनाने वर्धाकडे प्रयाण करतील.