जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे पोहचले डिजीटल शाळा कलपाथरी

0
20

मुलांशी हितगुज करुन वैयक्तिक,परिसर स्वच्छता व हात धुणे बाबतचे दिले धडे
गोरेगाव-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांना जलजीवन मिशन व स्वच्छ भारत कार्यक्रम अंतर्गत झालेले कामकाजाची पाहणी करण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्यात. त्यानुसार दि.14 फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी गोरेगाव तालुक्यातील हौसीटोला, कन्हारटोला व कलपाथरी गावाला भेटी देवुन ग्रामपंचायत,अंगणवाडी व शाळांना भेटी दिल्यात.
दि.14 फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी गावातील डिजीटील जिल्हा परिषद शाळेला भेट देवुन मुलांशी संवाद साधुन हितगुज केले.
डॉ.वानखेडे यांनी मुलांना सोप्या भाषेत शाळांमध्ये संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पूर्णपणे हात धुणे हा एकमेव प्रभावी मार्ग आहे.मुलांना धुण्याच्या पद्धती आणि साबण आणि स्वच्छ वाहत्या पाण्याने किमान २० सेकंद हात एकमेकांशी घासून घेण्याबाबत मार्गदर्शन केले.नेहमी हात धुवा: शौचालय वापरल्यानंतर.
हात धुणे, दात घासणे आणि आंघोळ करणे यासारख्या मूलभूत स्वच्छता दिनचर्या, मुलांना सोप्या भाषेत समजुन सांगितल्या. मुलांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजवुन सांगितले.
स्वच्छता म्हणजे चांगल्या पद्धती आणि विधी ज्या रोगांना प्रतिबंधित करतात आणि चांगले आरोग्य प्रदान करतात  अशा सवयी लावुन घेणे. प्रामुख्याने योग्य सांडपाणी विल्हेवाट, स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हे आरोग्य जपण्यासाठी, सुधारण्यासाठी तसेच निरोगी आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले.
जंतांचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी जेवण्याच्या आधी हात स्वच्छ धुवावेत,भाज्या व फळे खाण्यापूर्वी व्यवस्थित धुवाव्यात,स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे,पायात चपला/बूट घालावेत,नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत,शौचालयांचा वापर करावा,उघड्यावर शौचास बसू नये,शौचालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.
भेटी दरम्यान त्या वेळेस शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षिका,ग्रामपंचायत कलपाथरीचे सरपंच, ग्राम विकास अधिकारी तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजन अग्रवाल,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात,तालुका आरोग्य सहाय्यक रवि पटले उपस्थित होते.