गोरेगांव,दि.२०– तालुक्यातील स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी शाळेत शिवजयंती व इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी शिवजयंती वर आधारित गीत गायन, भाषण व मनोगत सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर.वाय.कटरे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून गंगाझरी पोलीस स्टेशन बीट जमादार भूपेंद्र कटरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमलताताई भगत,पाणलोट समिती अध्यक्ष विनोद गौतम उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बीट जमादार भूपेंद्र कटरे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर अनेक प्रसंगाच्या माध्यमातून माहिती दिली.परीक्षा तनावमुक्त वातावरणात व वेळेचे नियोजन करून द्यावी. विनोद गौतम यांनी शिवाजी महाराज व हिंदवी स्वराज्य याविषयी माहिती दिली व परीक्षेत भरघोष यश संपादन करून शाळेचे व आईवडीलांचे नाव लौकिक करावे असे विद्यार्थ्यांना आव्हान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आर.वाय.कटरे यांनी वीद्यार्थ्यांना “योग्य सूस्कांरीत घडा ,चांगले प्रयत्न करा यश संपादन करून सूजान नागरिक बना व केंव्हाही मार्गदर्शनाची आवश्यकता पडल्यास शीक्षकांकडे या आपल्या सर्वांसाठी शाळेचे द्वार खूले आहे. शिवाजी महाराजांसारखे कर्तुत्ववान व्हावे व शिवाजी महाराज व त्यांच्या जीवन चरित्रातूनत काहीतरी आदर्श घ्यावा असे प्रतीपादीत केले. कार्यक्रमाचे संचालन कू. मानसी पटले आणि आभार प्रदर्शन एस पारधी यांनी केले.याप्रसंगी शालेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
वर्ग 10वी च्या विद्यार्थींनी मनोगत व्यक्त केले वर्ग 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या तर सर्व मान्यवरांनी ,शीक्षकांनी मार्गदर्शन केले. वर्ग दहावीच्या विद्यार्थ्याकडून शाळेला भेटवस्तू प्रदान करण्यात आली वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.