गोंदिया,दि.२०ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.महिला व बालकल्याण समितीची आयोजित बैठक सुरु होण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी महिला व बालकल्याण सभापती सौ.पोर्णिमा उमाकांत ढेंगे,महिला व बालकल्याण समिती सदस्य श्रीमती लक्ष्मी तरोणे, श्रीमती उषा मेंढे, श्रीमती विमल कटरे, श्रीमती कल्पना वालोदे, श्रीमती कविता कापगते, श्रीमती जयश्री देशमुख, श्रीमती चंद्रकला डोंगरवार उपस्थित होते.