गोंदिया,दि.२०ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या ओदशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोदिया अंतर्गत “Legal awareness Camp, Goregaon” बाबत जनजागृती कार्यक्रम ग्राम न्यायालय, गोरेगाव येथे आयोजित १८ फेब्रुवारीला घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. के वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे होते.तसेच बाय जे.तांबोळी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया तथा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, ग्राम न्यायालय, गोरेगाव, अॅड. टि. बी. कटरे, अध्यक्ष जिल्हा वकील संघ, गोंदिया, अॅड. अतुल येडे, सहाय्यक लोक अभिरक्षक कार्यालय, गोंदिया, श्रीमती प्रज्ञा बोकारे तहसिलदार गोरेगाव,श्री. बम्हान, पंचायत समिती, गोंदिया, श्रीमती. टेकाम, सरपंच, ग्राम पंचायत, घोटी व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सह दिवाणी न्यायाधीश वाय. जे. तांबोळी यांनी विधी सेवा शिबीर व शासकीय योजनांचा मेळावा तसेच जनजागृती शिबीर तसेच ग्राम न्यायालय गोरेगावचे स्थानांतरणाची माहिती प्रास्ताविकातून दिली.जिल्हा वकिल संंघाचे अध्यक्ष अॅड. टि. बी. कटरे यांनी जनसमुदायास जन माहितीचा अधिकार (Right to Information Act, 2005) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अॅड. अतुल येडे यांनी ADR Methods & Its benefits & Maintanance & Welfare of Parents & Senior Citizen Act याबाबत माहिती दिली.अॅड. मंगला बन्सोड यांनी Victim Compensation Scheme & POCSO Act या विषयावर सविस्तर माहिती दिली.तहसिलदार श्रीमती प्रज्ञा बोकारे यांनी शासकीय योजना व शेतकऱ्यांच्या युनीक आयडी बाबत माहिती दिली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. के. वाळके यांनी Fundamental Duties of the Citizens याविषयावर माहिती देत भारतीय संविधानामध्ये ज्या प्रमाणे Fundamental Rights दिलेले आहेत.त्याचप्रमाणे भारतीय नागरीकांसाठी Fundamental Duties ची सध्या तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्य घटना व भारतीय लोकतंत्र हा विश्वाच्या पटलावर सर्वात मोठा लिखीत दस्तावेज मानला जात आहे.या दस्तावेज मध्ये संपूर्ण व सविस्तर माहिती राष्ट्राच्या विकासाकरीता यात सामावलेली आहे. प्रत्येक भारतीय नागरीक हा आपल्या हक्का बद्दल दावा करताना दिसून पडतो. परंतु कर्तव्यापासून लांब पळताना दिसतो. कुठल्याही राष्ट्राला विकासाच्या पातळीवर पोहचवायचा असेल किंवा विकसीत करावयाचा असेल तर त्या राष्ट्रातील नागरीकांना हक्काबरोबर कर्तव्याची जान जोपासायला हवे तरच राष्ट्र भरारी घेवू शकतो. त्याचप्रमाणे विधी सेवा म्हणजे काय? कोण कोण पात्र असतात, त्याचप्रमाणे विधी सेवेचा लाभ कशा प्रकारे घेता येतो तसेच वैकल्पीक वाद विवाद बाबत मध्यस्थी व लोकन्यायालयाव्दारे कशाप्रकारे सामाजस्यांने झटपट न्याय मिळवून देता येतो यावर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. एस. पी. पिचा, लाँचर, वकील संघ, गोरेगाव व आभार अॅड. डी. पी. खोब्रागडे, लयिर, वकील संघ, गोरेगाव यांनी मानले. सदर कार्यकमात जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्ला न्यायालय, गोंदिया येथील कर्मचारी, वकील मंडळी व न्यायीक अधिकारी यांनी सहकार्य केले व जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला