शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा करिता कार्यकारी अभियंता यांना साकडे

0
418

# भारतीय जनकल्याण फाउंडेशन ने घेतली दखल
# शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
# कालीमाटी सबस्टेशन ची क्षमता वाढविण्याची मागणी.
आमगाव :- आमगाव तालुक्यातील कालीमाती येथील विद्युत सब स्टेशन मधील विद्युत क्षमता वाढ करण्याच्या मागणी करिता भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या किसान आघाडी मार्फत उपविभागीय अधिकारी यांना साकडे घालण्यात आले.
कालीमाती येथील विद्युत सब स्टेशन मधील विद्युत दाब कमी असल्यामुळे कालीमाटी व परिसरातील गावांतील शेतकऱ्यांना शेतातील विद्युत पंपांना मिळणारी वीज ही हवी त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शेतातील पिकांसाठी पाणी वाहून घेण्यासाठी विद्युत पंपांना लागणारी वीज ही योग्य प्रमाणात मिळत नाही. शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने शेताला पूरक पाणी वाहून घेता येत नाही. व रब्बी पिकांचे नुकसान सोसावे लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती.याची दखल घेत भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या किसान आघाडी मार्फत याची दखल घेण्यात आली.संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी कालीमाटी सब स्टेशन गाठून साकडे घातले. यावेळी उपविभागीय कार्यकारी अभियंता अभिजित भांडारकर यांनी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी कार्यकारी अभियंता भांडारकर यांनी शेतकऱ्यांना लागणारी वीज विना खंडितपणे देण्याचे आश्वासन दिले. व सब स्टेशन मधील दाब वाढविण्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करण्याचे त्यांनी सांगितले. विद्युत दाब कमी प्रमाणात असल्यामुळे खंडित वीज पुरवठामुळे रब्बी पिकांना नुकसान होत असल्याचे माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी
शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना पाण्याची उपलब्धता अधिक व्हावी व विद्युत पंपांना मिळणारी वीज खंडित होऊ नये याकरिता वीज वितरण विभागाने कार्यतत्परतेने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.यावेळी उपस्थित उपविभागीय अभियंता यांनी संघटनेच्या शिष्टमंडळ व शेतकरी यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भारतीय जनकल्याण फाउंडेशन चे यशवंत मानकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमभाऊ बोहरे,उत्तम नंदेश्वर,मेघश्याम भाऊ मेंढे, नंदकिशोर खोब्रागडे, नरेंद्र ठाकूर, किरण रहांगडाले, राधेलाल चुटे, बेनिराम कटरे, सरपंच कैलास बिसेन, कमलेश मेश्राम, मिलिंद मेश्राम, मोदी बिसेन आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.