अर्जुनी-मोर.दि.२७ः तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड महाशिवरात्री तिर्थस्थळाचा 403 वर्षापासुनचा ऐतिहासिक ईतिहास आहे.तसेच ऐतिहासिक मुस्लीम दर्गा सुध्दा असल्याने हिंदु- मुस्लीम एकात्मतेचा अनोखा संगम येथे पहायला मिळतो.या दोन्ही पवित्र स्थळावर महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मोठी यात्रा भरते.पाच दिवस चालणा-या या यात्रेमधे 5 ते 10 लाख भावीक दर्शनासाठी येतात.अशा या पवित्रस्थळी अनेक सेवाभावी संघटना महाप्रसाद, शरबत,पिण्याचे पाणी आदी व्यवस्था नि:शुल्क करतात.यानिमित्त बाराभाटी ब्राम्हणटोला व अर्जुनी मोर.येथील फुंडे परिवाराने सन 1928 पासुन प्रतापगड च्या पहिल्या पायरीजवळ निशुल्क धर्मार्थ पाणपोईची व्यवस्था करुन लाखो भाविकांना पिण्याचे पाणी पाजुन पुण्य कमाविले आहे.
पुर्वीच्या काळात भाविकभक्त प्रतापगडच्या महाशिवरात्री यात्रेला बैलबंडी व पायीच येत असत.त्यावेळी भक्तांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या.अशा काळात ब्राम्हणटोला/ बाराभाटी येथील सेवाभावी वृत्तीचे स्व.रामाजी आडकुजी फुंडे यांनी प्रतापगड यात्रेच्या ठिकाणी सन 1928 पासुन धर्मार्थ पाणपोई ची व्यवस्था केली.त्या काळात कुठलाही सोय नसतांना कावळीने पाणी नेवुन पाणी साठा तयार करुन त्यांनी अनेक वर्ष भाविकभक्तांची तहान भागवुन मोठे पुण्य मिळविले.रामाजीच्या मृत्युनंतर त्यांचे चिरंजीव गणेश रामाजी फुंडे यांनी आपल्या वडिलांचा वसा अविरत सुरु ठेवला.आज गडापर्यंत पिण्याचे पाण्याची सोय असली तरी गणेश फुंडे परिवारांनी आजही धर्मार्थ प्याऊ ची सोय कायम ठेवली.भावीकभक्तांना स्वताचे हातानी पाणी पाजत गणेश फुंडे,संदिप फुंडे व संपुर्ण फुंडे परिवार मोठे पुण्य कमावीत आहेत.