अर्जुनी-मोर.दि.०१ः-स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात आज, दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले, समन्वयक डॉ. विलायतकर, मुख्य अतिथी डॉ.डी.एल.चौधरी, डॉ. लक्ष्मीकांत बोरकर, डॉ. देशमुख, प्रा. धुरटकर उपस्थित होते.
हा दिवस महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या १९२८ साली केलेल्या “रमण प्रभाव” (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारसरणी विकसित करणे हा आहे. या दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये पोस्टर स्पर्धा, वैज्ञानिक रिल्स, आणि PPT स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये पोस्टर स्पर्धत प्रथम : सेजल वालदे,द्वितीय : निशा रॉय,तृतीय :राशी बोरकर,PPTस्पर्धा प्रथम : वैष्णवी सूर्यवंशी,द्वितीय :कांचन अतकरी, तृतीय : अंकित पवार,वैज्ञानिक रिल्स स्पर्धा प्रथम : सौरभ गणवीर,द्वितीय : शिवली दास,तृतीय : साक्षी बेदरे,
स्पर्धेत सहभागी सर्वं विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक भाषणात डॉ विलायतकर यांनी कार्यक्रम आयोजना मागील भूमिका विषद केली.डॉ. डी. एल. चौधरी यांनी सर सी. व्ही. रमण यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि रमण प्रभाव कसा शोधण्यात आला याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच गणित विभागप्रमुख मोहन धुरटकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाळगावा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मोहुर्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की विज्ञान हा केवळ एक विषय नसून, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यास समाज प्रगतिशील होईल आणि देशाच्या विकासाला गती मिळेल.कार्यक्रमाचे संचालन कु. वैष्णवी सूर्यवंशी यांनी केले आणि आभार अनिकेत मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. मनोज बांगडकर, प्रा. पंकज उके, प्रा. अंकित नाकाडे, प्रा. आशिष कावळे, प्रा. भगत, प्रा. हेमंत परशुरामकर आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.