पक्षभेद विसरून समाज हितासाठी कार्य करा – डॉ. भुमेश्वर पटले

0
69

* डव्वा येथे चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती थाटात
सडक अर्जुनी-समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक असते. सामाजिक स्तरावर कार्य करताना अडचणी येत असतात. या अडचणीना पक्षीय राजकारणही कारणीभूत असतो. मात्र, समाज हितासाठी पक्षभेद विसरून कार्य केल्यास समाजाच्या विकासासाठी ते सोयीस्कर होईल, असे मत जि.प. सदस्य ही भुमेश्वर पटले यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा द्वारा संचालित क्षत्रीय राजाभोज पोवार सांस्कृतिक पर्यटन केंद्र डव्वाच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी आयोजित राजाभोज जयंती समारोह कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी सकाळी राजाभोज रॅली काढून करण्यात आली. रॅलीचे समापन राजाभोज नगरी चिरचाडी रोड डव्वा येथे करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून देवरीचे सभापती अनिल बिसेन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभोज रॅली गोंदियाचे अध्यक्ष पप्पू पटले उपस्थित होते.
यावेळी दीप प्रज्वलक म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, राजाभोज दिंडीचे उद्घाटक राजुभाऊ पटले, दिंडीचे स्वागताध्यक्ष माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष छायाताई चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून बेरार टाइम्स चे संपादक खेमेंद्र कटरे, महेंद्र बिसेन, भागचंद्र रहांगडाले, राजाभोज संघटना देवरीचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वनाथ रहांगडाले, दिनेश्वरीबाई युवराज गौतम सरपंच गोपालटोली, श्यामलाल पटले,
देवलाल कटरे, विष्णू रहांगडाले, डेकनलाल रहांगडाले, डॉ. डी. बी. रहांगडाले, चूनेश्वर पटले, कु. सोनल धनलाल ठाकरे, कु. ईशा दिनेश ठाकरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला राजाभोज नगरी येथे चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपस्थित अतिथी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर माता गढकालिका यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. लीलेश्वर रहांगडाले यांनी समाजाच्या वतीने मागील 13 वर्षांपासून राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना येणाऱ्या अडीअडचणीचे समाजाच्या मदतीने कशाप्रकारे निराकरण केले याविषयी सांगितले. पुढे बोलताना जि.प. सदस्य पटले यानी विकासात्मक दृष्टीकोणातून क्षेत्राला व परिसराला मदत करणार असल्याचे सागितले. यावेळी सभापती अनिल बिसेन यांनी मार्गदर्शन करताना समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग सुरू करण्यास प्राधान्य कसे देता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पप्पू पटले यांनी समाजाच्या हितासाठी आतापर्यंत काय काय केले व पुढे काय करता येईल यावर मार्गदर्शन करताना समाजातील युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी राजाभोज दिंडीचे उद्घाटक राजूभाऊ पटले, खेमेंद्र कटरे, छायाबाई चव्हाण, विश्वनाथ रहांगडाले यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन करून समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे यावेळी शासकीय नोकरीवर लागलेल्या सोनल ठाकरे व ईशा ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना आपण लहानपणी याच कार्यक्रमात स्वागतगीत सादर करण्यासाठी इथे यायचो. मात्र आता समाजाची प्रेरणा घेऊन शासकीय नोकरीत असल्याचे सांगून युवकांनीही प्रेरणा घेत ध्येय गाठावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन इंजी. मुन्ना चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन योगेश पटले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. लीलेश्वर रहांगडाले, भाऊलाल चव्हाण, श्याम गौतम, मुन्नालाल चौधरी, डॉ. सोहन चौधरी, मुना चौधरी, रेकचंद पटले, योगेश पटले, चेतन चौधरी, भाऊराव पारधी, ताराचंद शरणागत, विजय चौधरी, जितेंद्र चौधरी, सचिन रहांगडाले यांच्यासह इतर समाज बांधवांनी सह‌कार्य केले.