प्राथ.शिक्षक संघातर्फे आमदार व नवनिर्वाचित जि.प.पदाधिकारी सत्कार व शिक्षक मेळावा उत्साहात

0
295

शिक्षण सेवकांच्या मागण्या तसेच जुनी पेन्शन संदर्भात सक्षमपणे पाठपुरावा करणार- आमदार राजकुमार बडोले

गोंदिया: शिक्षक, विद्यार्थी व शाळा यांच्या अडचणी लोकप्रतिनिधीद्वारे शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करणारी राज्यातील एकमेव संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेल्या प्राथमिक शिक्षक संघाचा सत्कार सोहळा व भव्य शिक्षक मेळावा (एक मार्च)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे हजारो शिक्षक शिक्षिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले, जुनी पेन्शनच्या बाजूने मी नेहमी आपल्या सोबत आहे तशी सभागृहात देखील बाजू मांडली आहे,शिक्षण सेवक कालावधी कमी करणे व शिक्षण सेवक काळात स्व:जिल्ह्यात बदली करणे करिता सक्षमपणे शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्य नेते संभाजीराव थोरात व अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष काठोळे हे होते. शिक्षकांचे पंचप्राण थोरात यांनी सध्याच्या काळात शासनाने जिल्हा परिषद शाळेकडे व शिक्षकांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असून आधुनिक राष्ट्र घडवण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, अशैक्षणिक कामाचे ओझे बाजूला सारून शिक्षक आपल्या परीने उत्तम कार्य करत असल्याचे त्यांनी आपल्या उद्घाटनिय मार्गदर्शनातून सांगितले.
सत्कारमूर्ती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर ,माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले ,आमदार संजय पुराम, जि.प.चे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जि. प. माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले ,सभापती रजनीताई कुंभरे , सभापती दीपाताई चंद्रिकापुरे,सभापती मुनेश रहांगडाले यांचा या कार्यक्रमादरम्यान शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व सत्कारमूर्तींनी जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या शाळांचा व शिक्षकांचा अभिमान असल्याचे गौरव उद्गगार काढले. जिल्ह्यामध्ये शिक्षक करत असलेल्या कार्याची आम्हाला जाण आहे तसेच त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आम्ही शासन स्तरावर मांडून सोडवण्याचा प्रयत्न करत असून सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे सत्कारमूर्तींनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितले, या प्रसंगी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेडारकर, माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले,आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम,उपाध्यक्ष सुरेश हर्षे,माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले ,जिल्हा परिषद सभापती रजनी कुंभरे, सभापती मुनेश रहांगडाले यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे विशेष अतिथी संघटनेचे राष्ट्रीय संघटक नूतन बांगरे,राज्य उपाध्यक्ष उमाशंकर पारधी, राज्य उपाध्यक्ष आयुब खान, विभागीय अध्यक्ष केदार गोटेफोडे,राज्य सदस्य अनिरुद्ध मेश्राम हे होते.
#या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला शिक्षिकाकरिता हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी जिल्हाभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे संचालन यशोधरा सोनवणे यशवंती लिखार,नीतू दहाट यांनी केले त्यांना शिक्षक आणि महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी मदत केली#
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी आपले खास शैलीतून नवीन संच मान्यता मान्यतेचे भविष्यात होणारे दुष्परिणामामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्याकरता व हा संचमान्यतेचा शासन निर्णय कायमचा रद्द करणे काळाची गरज असल्याचे सत्कारमूर्तींना साकडे घातले तसेच शिक्षण सेवक योजना काळ प्रासंगिक होती ती रद्द करणे तसेच या महागाईच्या काळात मानधन चाळीस हजार करणे व शिक्षण सेवक कालावधीत कोणत्याही प्रकारची अट न ठेवता स्व:जिल्ह्यात बदली करणे यासह नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या समस्येचा पाढा वाचून याकडे सत्कारमूर्तीं आमदार महोदय यांचे लक्ष वेधले, जिल्ह्यातील वजनदार लोकप्रतिनिधी शिक्षक संघाच्या पाठीशी असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी आपल्या प्रस्ताविकेतून बावनकर यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष हेमंत पटले व तालुकाध्यक्ष कैलास हांडगे यांनी केले तर उपस्थित यांचे आभार जिल्हा सरचिटणीस अरविंद ऊके यांनी मांडले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी तसेच महिला आघाडी पदाधिकारी आणि संघटना प्रेमी शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले