४ मार्चला गोंदिया परिमंडळात’ लाईनमन डे ‘ साजरा होणार

0
201

गोंदिया,दि.२: ४ मार्च हा दिवस संपूर्ण देशभर ‘लाईनमन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या, निमित्ताचे औचित्याचे महावितरण गोदिया परिमंडळाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. परिमंडळतर्फे कृतत्यता भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील लाईनमन यांना कृतत्यता व्यक्त करण्यासाठी, सदर कार्यक्रम, संपूर्ण महाराष्ट्र जिल्हल्यात व विविध ठिकाणी, आयोजित करण्यात येतो.

लाईनमन म्हणजे ते कर्मचारी, जे उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांवर आणि खांबांवर जीवाची पर्वा न करता काम करून वीज पुरवठा, सुरळीत ठेवतात. वीजपुरवठाअखंडित राहावा यासाठी, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.लाईनमनसाठी कौशल्य आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण सत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.या कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कार्यस्थळी सुरक्षा विषयक मार्गदर्शन दिले जाईल

महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी कळविले आहे की वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी लाईनमनचा, गौराविंत करण्याचा, हा उद्देश आहे.