अर्जुनी-मोर. येथे भगवान विश्वकर्मा जन्मोत्सव साजरा
अर्जुनी-मोर. -भगवान विश्वकर्मा हे देवांचे वास्तुकला तज्ञ होते. त्यांनी विश्वकर्मा वास्तुशास्त्र या ग्रंथाची रचना सुद्धा केली होती. त्यांनी अनेक देवाधिकांसाठी नित्य नवीन अवजारे शस्त्रे अस्त्रे अलंकार असे बाराशेच्या जवळपास तंत्र यंत्र शश्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे भगवान विश्वकर्मा यांना निर्माता अभियंता वैज्ञानिक व विश्वासाचा निर्माता म्हणूनही संबोधले जाते. त्या काळी देवादिकितांच्या नगरांच्या रचनेत सौंदर्य अचूकता व सुख सोयी यांचा मिलाप होता. त्यामुळेच भगवान विश्वकर्मा वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते होते असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
अर्जुनी मोरगाव तालुका लोहार/ सुतार समाज संघटनेच्या वतीने भगवान विश्वकर्मा जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित( ता. 2 ) कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून भेंडारकर बोलत होते.यावेळी पंचायत समिती उपसभापती संदिप कापगते,गोंदिया जिल्हा लोहार समिती अध्यक्ष अनिल मेश्राम, सुरेश मांडवगने, मेघश्याम हजारे,पारस शेंडे,यादोराव कुंभरे,चिंताराम पंधराम, सुभाष बागडे,यशवंत सुरंभकार, यशवंत मेश्राम, प्रेमलाल बाळबुद्धे, छगनलाल कोसरे, नीलकंठ उके, राजकुमार मेश्राम, राजेंद्र बावणे, दुर्वासजी, रचनाताई वकेकार, मोरेश्वर कोसरे, हिराताई कोसरे, रितूताई कोसरे, मेघाताई के, चिंतेश्वर बावणे, जागेश्वर मेश्राम व लोहार सुतार समाज संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते
सर्वप्रथम भगवान विश्वकर्मा यांचे प्रतिमेचे पुजन व समाजसंघटनेचा ध्वज फडकवुन जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधुन नवनिर्वाचित गोंदिया जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचा समाज संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक वक्त्यांनी भगवान विश्वकर्मा यांचे जिवनचरित्रावर प्रकाश टाकुन गोंदिया जिल्ह्यातील लोहार/ सुतार समाजांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. हा तालुकास्तरीय जन्मोत्सव कार्यक्रम असल्याने सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.