गोंदिया,दि.०४ः जिल्ह्यातील जनतेसह शेजारील मध्य प्रदेश राज्यातील जनतेला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने, २ मार्च रोजी रामायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरचा उद्घाटन कार्यक्रम पार पडले. स्थानिक राणी अवंतीबाई चौकातील बोपचे पेट्रोल पंपासमोर असलेल्या रामायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरचे उद्घाटन तिरोडा -गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पार पडले.या कार्यक्रमाला बालाघाट-शिवनीच्या खासदार भारती पारधी,आमदार विनोद अग्रवाल,माजी आमदार गोपालदास अग्रवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे,माजी नगर परिषद सभापती मैथुला बिसेन, महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव अमर वराडे,पी.जी.कटरे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष झामसिंग बघेले,जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एड.टी.बी.कटरे,बाजार समितीचे संचालक यु.टी.बिसेन,राजलक्ष्मी तुरकर,डॉ.पुरोहीत, डॉ. दिप बिसेन,श्रीमती रीमा बघेले, तुमेर सिंग बघेले, माया करवाडे, भगवान करवाडे, श्रीमती खिलेश्वरी कटरे,श्रीमती अंजली रहांगडाले उपस्थित होते. रामायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरचे डॉ. ओम बघेले, डॉ. निशांत करवाडे, डॉ. स्वीटी टी.कटरे (बघेले), डॉ. विनय रहांगडाले, डॉ. आकांक्षा सिंग राज करवाडे,डॉ. मिताली सी. पारधी (रहांगडाले) आदि डॉक्टर या रुग्णालयात रुग्णांना सेवा देणार आहेत.