गोंंदिया,दि.०८ः जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य समितीचे सभापती सुरेश हर्षे यांनी ७ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा व प्राथमिक आरोग्य केंद्र काळिमाटी येथे आकस्मिक भेट देत तेथील व्यवस्था बघून असमाधान व्यक्त केले.तसेच कर्मचारी अधिकारी यांनी रजेचा अर्ज करुनच गैरहजर रहावे अशा स्पष्ट सुचना दिल्या.जनसामान्य, गरजु मजुर वर्गाला शासकीय आरोग्य सेवा उत्तम प्रकारे वेळेत मिळावी व शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामाच्या दृष्टिकोनातून रुग्ण ओपीडी 8:30 वाजे सुरू होऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामाआधी आपले उपचार व्हावे.याकरीता नियोजन करण्याचेही निर्देश आरोग्य सभापती हर्षे यांनी दिले.त्याचप्रमाणे औषध पुरवठा वेळीच व्हावे याबाबत आरोग्य समिती मध्ये दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे अन्यथा कारवाईस तयार रहावे अशा सुचना दिल्या.