अर्जुनी मोरगाव-स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात श्रद्धेय शिवप्रसाद जायस्वाल यांच्या जयंती निमित्ताने मागील सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष लुनकरण चितलांगे हे होते तर प्रमुख अतिथी अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, संस्था उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल, सचिव मुकेश जायस्वाल, कोषाध्यक्ष नंदकिशोर राठी, सदस्य डॉ कैलास गाडेकर, ममताताई जायस्वाल, मनीष जायस्वाल, प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले, डॉ आश्विन चंदेल, डॉ. के. जे. सीबी, प्रा. लक्ष्मीकांत कापगते, डॉ डी. एल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात स्व. शिवप्रसाद जायस्वाल यांच्या प्रतिमापूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाली .
यावेळी प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांनी शिवप्रसादजी यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रती असलेल्या तळमळीतून या महाविद्यालयाची स्थापना झाल्याचे आणि ग्रामीण भागातील हे महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगती करीत असल्याचे सांगितले.
तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी यशस्वी होण्याकरिता स्वतःशी स्पर्धा करा, स्वतःला ओळखा आणि ध्येय निश्चित करून त्याचा सातत्याने आणि प्रामाणिकपणे पाठलाग करा तेव्हाच तुम्ही विद्यार्थी यश प्राप्त करू शकता असे मौलिक विचार व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल यांनी ग्रामीण परिसरातील मुलींना शिक्षणाची सोय नव्हती या विचारातूनच शिवप्रसादजींनी संस्थेची स्थापना केली. या मुळे या परिसरातील बहुसंख्य मुलींना आपले शिक्षण पूर्ण करता आले असे विचार व्यक्त केले.या प्रसंगी मागील सत्रात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 24 दात्यांनी रक्तदान केले.
अध्यक्षीय भाषणातून लुनकरण चितलांगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी, संचालन डॉ. आशिष कावळे आणि डॉ डी.एल चौधरी यांनी तर आभार डॉ शरद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विकरिता सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.