महिलांची सामाजीक शैक्षणिक व आर्थिक प्रगती उंचावली:- लायकराम भेंडारकर

0
10

घुसोबाटोला येथे जागतिक महिला दिन साजरा
अर्जुनी-मोर.-सध्याचे केंद्र व राज्य शासनानी महिलांसाठी आर्थिक प्रगतीचे दार खुले केले आहे. उमेदच्या माध्यामातुन ग्रामसंघ व प्रभाग संघ आणी बचत गटाचे माध्यामातुन महीला उद्योगशील बनल्या आहेत.आपली आर्थिक बाजु कशी मजबुत होईल.व आपला संसार सुखाचा कसा होईल हे तंत्र महिलांना सापडले आहे. गावागावांतील महिलांनी आपल्या कष्ट परिश्रम आणी समर्पणाच्या जोरावर समाजात महत्वपुर्ण स्थान मिळविले आहे. जागतीक महिला दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रम महिलांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन ठरत असल्याचे प्रतिपादन गोंदिया जि.प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
अर्जुनी-मोर. तालुक्यातील आपल्या गृहक्षेत्रातील घुसोबाटोला येथे आयोजीत जागतीक महीला दिनाचे कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून ता.8 भेंडारकर बोलत होते. यावेळी पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते, सरपंच लताबाई भेंडारकर, उपसरपंच सुखदेव मेंढे, पोलीस पाटील शालूताई मेंढे, डोंगरगाव चे पोलीस पाटील उमेश खंडाईत, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुभाष ब्राह्मणकर, ग्राम पंचायत अधिकारी बडोले, भाजीपाले मॅडम, बनसोड मॅडम, जयराम हातझाडे, अंगणवाडी सेविका खंडाईत, पुरुषोत्तम डोये, यशवंत भेंडारकर, संजय भेंडारकर, दर्शना गणवीर, लक्ष्मीताई भेंडारकर, व गावातील सर्व महिला व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माॅ.जिजाऊ,माता रमाई यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी अनेक मान्यवर व महिलांनी आपले अनुभव कथन करतांना आज आम्हा महीलांना सावित्रीबाई फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळेच शिक्षण,समता न्याय व बंधुत्व यांची शिकवन मिळाल्यानेच आम्ही आत्मनिर्भर झालो असल्याच्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचा ग्रामवासियांचे वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.संचालन उमराव शहारे तर उपस्थितांचे आभार शालुताई मेंढे यांनी मानले.कार्यक्रमास सिलेझरी,डोंगरगाव,व घुसोबाटोला येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.