महिलांचा सन्मान, हाच राष्ट्राचा सन्मान दिवाणी न्यायाधीश एन.वि.साहु

0
8

अर्जुनी/मोर.-स्थानिक सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट व जी.एम.बी. हायस्कूल अर्जुनी मोर. येथे ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून समाजातील व प्रशासकीय सेवा बजावत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा मार्गदर्शन व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती केशरबाई शिक्षण संस्थेच्या सदस्या नेहा भुतडा, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून, एन. वी. साहू दिवाणी न्यायाधीश अर्जुनी मोर. प्रमुख अतिथी डॉ. नंदा गेडाम अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. सारिका काटेखाये सरकारी वकील, सारिका बेलेकर, पल्लवी वाडेकर खांडविकास अधिकारी अर्जुनी मोर . छाया घाटे, प्राचार्या शैव्या जैन, मुख्याध्यापिका कल्पना भुते, प्रा. नंदा लाडसे, प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रांचे पूजन व दिप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू….!”
प्राचीन काळापासून महिला ही उपेक्षित जीवन जगत होती ती आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.आज स्त्री पुरुष समानता अस्तित्वात असतानाही महिलांना समजात सन्मानाने वावरता येत नाही त्यांना समाजात सन्मानाने वावरता यावे यासाठी सरकारद्वारे सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांच्या सुरक्षेविषयी केलेले विविध कायदे यांची माहिती प्रमुख मार्गदर्शक दिवाणी न्यायाधीश एन. वी. साहू यांनी दिली. आजची स्त्री ही विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. या धावपळीमध्ये तिने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. नंदा गेडाम यांनी केले. स्त्री ही माता आहे, भगिनी आहे, ती कुटुंबाचा आधार आहे. आणि हा आधार सर्वांनी मिळून जपणे गरजेचे आहे. युवतींनी चांगले विचार आचरणात आणले पाहिजेत असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षा नेहा भुतडा यांनी मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मेंढे यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी वणवे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.