१०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत खैरी/वलमाझरीत समाधान शिबिर

0
21

– शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचा उत्साह

भंडारा, दि.12 : ग्रामपंचायत कार्यालय, खैरी/वलमाझरी येथे उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या वतीने ‘१०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत एक विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्हाधिकारी संजय कोलते , उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, निलेश कदम तहसीलदार, सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे, ग्रामविकास अधिकारी नरेश शिवणकर, अनिल फुलझेले साहेब  उपअधीक्षक भूमी-अभिलेख कार्यालय साकोली आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विविध शासकीय विभागांनी शिबिरात आलेल्या नागरीकांना आवश्यक माहिती पुरवली आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले.

विभागवार सेवा वितरणाचे तपशील

महसुल विभाग: Agristek ID – ३२ ,जात प्रमाणपत्र – ०५ ,सातबारा वाटप – ४०, उत्प्पन प्रमाणपत्र – ०२,

संजय गांधी आधार कार्ड – ०३ ,नवीन राशन कार्ड – ०२,

राशन कार्ड नाव चढविणे व कमी करणे – ०६ ,उत्प्पन दाखले – २०

भूमिअभिलेख विभाग:स्वामित्व योजनेअंतर्गत ५० नागरिकांना घरांचे सनद वाटप करण्यात आले.

कृषी विभाग: PM-KISAN योजनेचे २० अर्ज वाटप करण्यात आले.

आरोग्य विभाग: बी.पी. व शुगर तपासणी – ६० नागरिकांचे परीक्षण, आयुष्मान भारत कार्ड – १५ नागरिकांचे तयार , इतर आरोग्य तपासण्या – १६

ग्राम प्रशासन विभाग: घरकुल – ०७, शबरी योजना – ३१

वैयक्तिक शौचालय – ०८ अर्ज प्राप्त ,दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र – १२,जन्म प्रमाणपत्र – ०७ ,मृत्यू प्रमाणपत्र – ०३.

नागरिक आणि शेतकरी यांचा लाभ

         या शिबिरात ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी येथील शेतकरी व नागरिकांनी सक्रिय सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा आनंद साजरा केला. विविध विभागांनी एकत्रितपणे समस्यांचे निराकरण करून नागरीकांच्या अडचणी दूर केल्या. या प्रकारच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विकास आणि सेवांमध्ये लवकरच सुधारणा अपेक्षित आहे.

        या समाधान शिबिराच्या आयोजनाने ग्रामीण भागातील शासकीय योजनांचा लाभ सहजगत्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत केली असून, आगामी काळात अशाच प्रकारच्या पुढाकारांनी आणखी विकासाच्या मार्गावर वाटचाल होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.