आंबेडकरभवन पाडल्याच्या विरोधात साकोलीत धरणे

0
7

साकोली,दि.२-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील घराची नासधूस करणार्यावर कठोर कार्यवाहीची मागणी करण्यासोबतच आंबेडकरी विचार, आंबेडकरी चळवळ, आणि आंबेडकरी वारसा राखण करणे , अनुसूचित जाती/जनजातीवरील अत्त्याचाराचा निषेध नोंदविणे. महीला विध्यार्थी वरील अत्याचार व त्यांची अपुरी सुरक्षा , शोषित पिडीत व श्रमिकांच्या अधिकारांवरील हल्ल्याच्या विरोधात साकोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात अचल मेश्राम, शिवकुमार गणवीर, आर.एम.अंबादे, ताराबाई तर्जुले, कौशल्याबाई नंदेश्वर, निलेश घरडे, रवी सोनपिपरे, गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता सहभागी झाली होती.