भारनियमन विरोधात साकोलीत शेतकऱ्यांचा एल्गार

0
12

राकेश भास्कर
साकोली,दि.२-आॅगष्ट महिना लागूनही तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाहीत. अपुरा पाऊस, वरून वीज वितरण कंपनी तर्फे कृषीपंपाला १६ तासाचे भारनियमन ह्यामुळे ह्यावर्षी शेतकर्यांना दुष्काळ सहन करण्याची वेळ आली आहे.भारनियमन बंद झाले तर खोळंबलेली रोवणी पूर्ण होतील.त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कृषीपंपावरील १६ तासाचे भारनियमन बंद करावे या मागणीला घेऊन सोमवारला तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, कॉंग्रेस चे जी.प. सदस्य अशोक कापगते, नरेंद्र वाडीभस्मे, राकेश भास्कर, प्रवीण भांडारकर, नामदेव टेंभूर्णे तसेच लवारी, उमरी, विर्शी तसेच इतर गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
महाविजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रजेवर असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.मात्र त्यांचे समाधान करायला उपअभियंताही येऊ शकले नाही ही भाजप काळातली अवस्था आहे.विशेष म्हणजे पोलिस विभागाने जमावबंदी लागू असल्याचे कारण पुढे करीत आंदोलनाची परवानगी नाकारली.त्यानंतरही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने वीजवितरण कार्यालय साकोली येथे उपस्थित होऊन आपल्या मागण्या मंजुर होत नाही,तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केल्याने प्रशासनाची चांगलीच ताराबंळ उडाली आहे.