महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता पुरेपूर प्रयत्न करणार- जि.प.सदस्या अश्विनी पटले

0
48

गोंदिया,दि.१५ः-अदानी फाउंडेशन तिरोडा यांच्या माध्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे लाखे पासून बांगड्या इतर साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण 03 ते 08 मार्च 2025 पर्यंत घेण्यात आले होते.यात 30 महिलांना 06 दिवस प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी लाखे पासून बांगड्या व विविध वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले.अदानी फाउंडेशन तिरोडा तर्फे जयपुर येथील सुप्रसिद्ध प्रशिक्षक म्हणून शहदाब अहमद, कु.रिफाखत सुलताना, कु.मंताशा खान यांनी प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले,अदानी फाउंडेशन तिरोडाचे प्रकल्प समन्वय बिमूल पटेल,शालु चौधरी सरपंच एकोडी,माजी सरपंच रविकुमार ( बंटी ) पटले,अजाबराव रिनायत पंचायत समिती सदस्य , वर्षा अंबुले उपसरपंच एकोडी, दिपक रिनायत ग्राम पंचायत सदस्य,संगीता रिनायत ग्राम पंचायत सदस्य, संगीता वरठी ग्राम पंचायत सदस्य,आशाताई बाळने ग्राम पंचायत सदस्य दांडेगाव, कु.दीपा बेद्रे अदानी फाउंडेशन प्रतिनिधी, अरुणकुमार बिसेन अध्यक्ष शाळा व्य.समिती, पत्रकार राजेशकुमार तायवाडे उपाध्यक्ष शाळा व्य.समिती, पत्रकार महेंद्र कनोजे सदस्य शाळा व्य.समिती, आर.एस.ताजने मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा एकोडी, एम.आर.उईके सहाय्यक शिक्षिका, शुभांगी रिनायत,वासुदेव बिसेन तसेच सर्व प्रशिक्षणार्थी महिला व गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अदानी फाउंडेशन तिरोडा यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले.