जलसंपदा विभागाच्या वतीने जलजागृती प्रभात फेरीचे आयोजन

0
243

गोंदियादि.18: जलसंपदा विभाग, गोंदिया यांच्या वतीने जलजागृती सप्ताह अंतर्गत जलजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीस जलसंपदा विभाग अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग-गोंदिया, गोंदिया पाटबंधारे विभाग व त्याअंतर्गत सर्व उपविभाग, बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग- गोंदिया व त्याअंतर्गत सर्व उपविभाग, मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभाग- गोंदिया विभाग व त्या अंतर्गत सर्व उपविभाग, मृद व जलसंधारण विभाग- गोंदिया, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद गोंदिया, धापेवाडा उपसा सिंचन विभाग तिरोडा, महाराष्ट्र प्राधिकारी विभाग गोंदिया व इतर विभाग/उपविभागतील अधिकारी व कर्मचारी तसेच  एस.एस. गर्ल्स माध्यमिक शाळा, राजस्थान कन्या महाविद्यालय, आदर्श सिंधी शाळा व इतर शाळा, गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशन, सशक्त नारी संस्था, आंचल बहुउद्देशीय संस्था व इतर असोसिएशनचे सदस्य यांचा ऊत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.

             प्रभात फेरीला नेहरु चौक येथून सुरुवात झाली, गोरेलाल चौक ते गांधी प्रतिमा चौक- जयस्तंभ चौक मार्गे पुन्हा नेहरु चौक येथे समाप्त झाली, यामध्ये शहरातील प्रमुख भागांचा समावेश होता. सहभागींनी पाणी बचतीचे महत्त्व आणि वापराबाबत जोरदार घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले. या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचा उद्देश होता.

             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिखा पिपलेवार (सहाय्यक अभियंता श्रेणी- 1- पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग-गोंदिया)  सोनाली सोनूले ( कार्यकारी अभियंता- गोंदिया पाटबंधारे विभाग) यांनी केले  तर  आर. कुरेकर ( कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग-गोंदिया),  चंद्रकांत डोंग्रे (उपविभागीय अभियंता, बाघ इटियाडोह पाटबंधारे उपविभाग), पारधी (उपविभागीय अभियंता, मध्यम प्रकल्प पाटबंधारे उपविभाग गोंदिया),  ईशांत निनावे,  प्रांजल डोंगे,  प्रतिक गेडाम, ऋषीकेश मगर यांनी सहकार्य केले.

               कार्यक्रमाच्या शेवटी  प्रत्येक सहभागीस प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आयोजकांनी सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात पाणीबचतीची जाणीव निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले. हा उपक्रम पाणी संवर्धन आणि जबाबदारीने त्याचा वापर करण्याच्या संदेशाचा प्रसार करणारा महत्त्वाचा टप्पा ठरला.