गोंदिया,दि.२४ मार्च: गोंदियातील VSS (व्हीएसएस) ग्रुपने छत्रिचंद महोत्सव २०२५ च्या शुभ प्रसंगी सिंधी कॉलनीतील सिंधी स्कूल परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले.या शिबिरात ८२ रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेत मानवी सेवेच्या या उदात्त कार्यात योगदान दिले.
रक्तदान शिबिराची सुरुवात देवता श्री झुलेलाल साईजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. समाजातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने रक्तदान केले. शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला शहरातील प्रमुख मान्यवर दर्यानोल आसवानी सिंधी जनरल पंचायत अध्यक्ष,नागेश भास्कर जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक,श्री.चकाटे,सुधीर वर्मा गंगाझरी पोलीस निरीक्षक,शिखा पिपलेवार सामाजिक कार्यकर्त्या,राजू नोटानी, महेश आहुजा, एड. इंदर कुमार होटचंदानी,समाजसेवक रोहित अग्रवाल, भाईसाहेब हसनंद मुक्ता, लक्ष्मीचंद रोचवानी, विजय मनुजा, महेश हसीजा, मनीष वाधवानी, नरेश लालवानी, अनिल गंबानी, एड. जयपाल नूनानी, देव नागदेव, विनय अनवाणी, हरीश अग्रवाल, राजेश शिवलानी, रमेश तनवाणी, सोनू नागदेव, अमित थडानी, विकी तोलानी, अरुण दरयानी, तानिया भगवानी, कविता प्रीथ्यानी, आरती अडवाणी,व्हीएसएस ग्रुपचे गुड्डू चांदवानी संस्थापक,धरम खटवानी अध्यक्ष,सुनील संभवानी सचिव,अजय गोपलानी कोषाध्यक्ष,सक्रिय सदस्य दीपक कुकरेजा, भूषण रामचंदानी, संजय तेजवानी, मोनू शिवदासानी, दिनेश रमानी, सुमित सतानी, शाम वाधवानी, प्रदीप कोडवानी, सुनील मोटवानी, रितेश नागदेव, दीपक आहुजा उपस्थित होते.