गोंदिया,दि.२४ः-तालुक्यातील रायपुर येथे गेल्या दोन वर्षापासून ग्रामरोजगार सेवक हे पद रिक्त होते.गावातील रोजगार सेवक नसल्यामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात होत असलेला त्रास लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठराव घेत गटविकास अधिकारी यांच्या मंजुरीने ग्रामरोजगार सेवक पदाची जाहिरात काढण्यात आली.त्या जाहिरातीनुसार आठ पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल केले,त्या अर्जांच्या छाणनीनंतर निवड प्रक्रियेकरीता आयोजित विशेष ग्रामसभेला गावातील ६०५ नागरिकांनी उपस्थितीत दर्शविली.२१ मार्च रोजी ज्योतिबा फुले सभागृह रायपुर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच छायाताई नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. सदर विशेष सभेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी कमलेश बिसेन यांनी पाहिले. यावेळी रोजगार सेवक निवड प्रक्रिये संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन ग्रामपंचायत अधिकारी बिसेन यांनी केले.नियोजनाच्या भाग म्हणून निवड प्रक्रियेमध्ये गोंधळ होऊ नये याकरिता ग्रामसभेसमक्ष सर्व स्वाक्षरी केलेल्या नागरिकांना शिफारस पत्रिका वाटप करण्यात आली.त्यानुसार 598 नागरिकांनी लेखी शिफारसपत्रिकेवर खून करून दर्शवली.सदर शिफारस पत्रिकेची मोजमाप सभेसमक्ष ग्रामपंचायत अधिकारी कमलेश बिसेन यांनी करीत सर्वाधिक शिफारस प्राप्त उमेदवार राजकुमार (बालू) फाये यांची विशेष ग्रामसभेत बहुमताने निवड करण्यात आली.या विशेष सभेला ओमकार मात्रे उपसरपंच , शैलेश गजभिये सदस्य , उमेश ठाकरे सदस्य, लता हटेले सद्स्य, सरस्वती टेकाम सदस्य, उषा फाये सदस्य, कल्पना कोहरे सदस्य, अल्का ठाकरे सदस्य, ओमशंकर रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता, राजू रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता, केवलचंद रहांगडाले माजी सरपंच, जीतलालजी रहांगडाले माजी सरपंच, मनोज कोल्हे माजी सरपंच, केवल राम रहांगडाले माजी सरपंच,डॉ सोहनलाल रहांगडाले माजी पंचायत समिती सभापती,डॉ. बिसेन माजी उपसरपंच, नरेंद्र बोरकर सामाजिक कार्यकर्ता,धर्मेंद्र देशभ्रतार सामाजिक कार्यकर्ता, मनोज मेश्राम, संजय घरटे, हरिचंद बिसेन, चुन्नीलाल रहांगडाले, शालिग्राम पाचे, गुनि राम कोहरे, रूपदास दणदरे सामाजिक कार्यकर्ते , दिनेश येशने तमुस अध्यक्ष, लोकचंद बिजेवार पोलीस पाटील उपस्थित होते.सदर सभेला ज्योतिष रहांगडाले संगणक परिचालक,अशोक पाचे परिचर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी सहकार्य केले.