गंगाझरीत निशुःल्क आरोग्य शिबिरात ९२ ग्रामस्थांची तपासणी

0
86

गोंदिया,दि.२९ –तालुक्यातील ग्रामपंचायत गंगाझरी, मोहबे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कामगार विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘तपासणी ते उपचार’ या योजनेच्यावतीने २८ मार्च २०२५ रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 92 ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून घेतली, त्यापैकी 61 जणांना विशेष उपचार योजनेंतर्गत लाभ मिळाला. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, हृदयविकार, किडनी व लिव्हर फंक्शन टेस्टसह विविध तपासण्या व मोफत औषध वाटप करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनात ग्रामपंचायत सरपंच सोनुभाऊ गराडे, उपसरपंच, वसीम शेख, लोकेश नागभीरे, संदीप मरसकोल्हे आणि इतर सदस्य, तसेच मोहबे हॉस्पिटलचे डॉ. विनोद मोहबे, डॉ. सी. एल. जगनिक, वरिष्ठ स्टाफ नर्स मंगला मेश्राम, प्राजक्ता टेंभरे, प्रणाली बागडे, तसेच ‘तपासणी ते उपचार’ योजनेचे आकाश हटवार (एमएमयू जिल्हा समन्वयक), डॉ. निलेश बिरणवार, प्रगती गजभिये, संघमित्रा गणवीर, प्लेबॉटोमिस्ट मृणाली व पायल यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

साजन दादुरिया व आकाश हटवार यांनी तिन्ही विभागांचे एकत्रित नियोजन करून शिबिराचे उत्तम व्यवस्थापन केले. त्यांनी शिबिरात येणाऱ्या लोकांना आरोग्य सल्ला (कन्सल्टिंग) दिला आणि त्यांना योग्य तपासणी व उपचार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिबिर अधिक प्रभावी आणि यशस्वी झाले.