मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारांना निवेदन

0
26

अर्जुनी-मोर.-अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली असून सध्या मका कापणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी लवकरच मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी बाजारात आणणार आहेत. मात्र, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता आहे, कारण शासनाने निश्चित केलेली आधारभूत किंमत २३ रुपये प्रतिकिलो (२३०० रुपये प्रति क्विंटल) असताना व्यापारी केवळ २००० रुपये प्रति क्विंटल दराने मका खरेदी करत आहेत.

या परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर चिंतामण तरोणे यांनी आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे शासनाने त्वरित मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदन प्रसंगी प्रगतशील शेतकरी यादवराव पाटील तरोणे कालिदास पुस्तोडे प्रेम अग्रवाल व अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना योग्य दर मिळावा यासाठी शासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.