उमेद म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना संधीचे सोने करणारा क्षेत्र:- लायकराम भेंडारकर

0
53

माहुरकुडा येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न )
अर्जुनी-मोर.- आजच्या काळात महिलांना सक्षम बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्या सोबतच त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. उमेद योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष उपयुक्त असून त्यामध्ये त्या आपले उद्योजकतेकडे वळू शकतात. महिलांना सक्षम करणे आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेला चालना देणे हे या योजनांचे मुख्य उद्दिष्ट आहे.तेव्हा महिलांनी उमेदच्या माध्यामातुन प्रभाग व ग्रामसंघ तथा बचतगटाचे वतीने प्रगतशील महीला बनने काळाची गरज आहे.महिला बचत गटांमुळे महिला भगिणींचे आर्थीकदृष्ट्या जिवनमान उंचावल्याचे जिल्ह्यात दिसुन येत आहे.महिला आर्थीकदृष्ट्या सक्षम झाल्या तर संसाराचा भार सांभाळण्यासाठी सोयीचे होते.त्यासाठी उमेद म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना संधीचे सोने करणारा व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन गोंदिया जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित “उज्वल प्रभाग संघ” यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन दिनांक 29/3/2025 ला माहुरकुडा येथे करण्यात आले. या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून लायकराम भेंडारकर बोलत होते.यावेळी त्यांनी विविध उपक्रम व योजनेविषयी सखोल माहितीही दिली.
कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रवीणाताई गायधने अध्यक्ष उज्वल प्रभाग संघ, कविताताई कापगते जिल्हा परिषद सदस्य, आम्रपाली डोंगरवार सभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, लक्ष्मीकांतजी नाकाडे सरपंच माहुरकुडा, उज्वलाताई डोंगरे उपसरपंच माहुरकुडा, चंद्रकला येरणे माजी सरपंच, वनिता नागपुरे,शालिनी नाकाडे, इंदुताई नाकाडे, योगेश्वरी चुटे, कल्पना लाडे, मंदाताई गावळ, शीला शहारे, रत्नमाला राऊत, बबिता वासनिक, मनिषा चौधरी, प्रतिमा नरवास, जया चौरीकर, प्रवीण रामटेके,गोपाल मेश्राम, दिगंबर कुराडे, तुळशीदास भंडारी, उषाताई नाईक,कैलास गुप्ता, कविता चव्हाण,तसेच उज्वल प्रभाग संघाचे सदस्य,आणि विविध ग्रामसंघातील महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.