33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ कारंजा शहरातील दिल्ली वेस दुरुस्तीसाठी शासनाकडून २ कोटी २२ लाख ७५ हजार...

कारंजा शहरातील दिल्ली वेस दुरुस्तीसाठी शासनाकडून २ कोटी २२ लाख ७५ हजार ५५८ निधी मंजूर

0
37

blank

वाशिम,दि.२९ मे – कारंजा तालुक्यातील पुरातत्त्व महत्त्व असलेली ऐतिहासिक वास्तू दिल्ली वेस ही सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोका बनली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश येत, २ कोटी २२ लाख ७५ हजार ५५८ इतका निधी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे.
दिल्ली वेस ही कारंजा शहराची एक ऐतिहासिक ओळख असलेली वास्तू आहे. दीर्घकाळापासून योग्य देखभाल न झाल्याने या वास्तूची अवस्था अत्यंत खराब झाली होती. नागरिकांच्या मागणीनंतर आमदार सई प्रकाश डहाके यांनी पालकमंत्र्यांमार्फत शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश येत, शासनाने दि. २१ मे २०२५ रोजी अधिकृत आदेश काढून दिल्ली वेस दुरुस्तीच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कारंजा शहरातील ऐतिहासिक वारसा जपला जाणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसह पर्यटनदृष्ट्या देखील परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

blank