जय’ जिवंत नाही-खा.पटोले

0
9

भंडारा: जिल्हयातीलच नव्हे तर राज्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेला वाघ ‘जय’ याची शिकार करण्यात आली असुन तो जिवंत नसल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.तसेच या सर्व प्रकाराला वन विभाग पुर्णपणे जबाबदार असुन त्याची तक्रार पं्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करून ‘जय’ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत सांगीतले. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असलेला ‘जय’ याची अज्ञातांकडुन शिकार करण्यात आली आहे.मात्र वनविभाग त्या संदर्भातील तथ्य पुढे न आणता निरर्थक गोष्टींचा आधार घेत ‘जय’ जिवंत असल्याचा देखावा करीत आहे.‘जय’ च्या नसण्याला पुर्णपणे वनविभाग जबाबदार असुन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सुध्दा खा.पटोले यांनी केली. ‘जय’ हा उमरेड-कºहांडला अभयारण्यात येणाºया पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र होते.‘जय’ ला बघण्याकरीता देश-विदेशातुन पर्यटक येत असत त्यामुळेच एका वर्षात शासनाला २४ कोटी रूपयाचे भांडवल प्राप्त झाले होते.तसेच उमरेड-कºहांडला अभयारण्य परिसरातील बेरोजगारांना बºयापैकी रोजगार प्राप्त झाला होता.मात्र मागील दोन-तीन महिन्यापासुन ‘ज़य’ उ म् ा र े ड – क º ह ा ं ड ल् ा ा अभयारण्यातुन बेपत्ता असल्याने पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे.त्याचा फटका शासनाच्या महसुलावर बसत असून परिसरातील बेरोजगारांच्या रोजगाराचा सुध्दा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘जय’ याने अभयारण्यातुन स्थलांतरण केले असल्याचे वन विभागातर्फे सांगीतले जात असले तरी ‘जय’ ची शिकार झाली असून तो जिवंत नाही हीच वास्तविकता असल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.या प्रकरणी काही दिवसातच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन या विषयी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेसुध्दा सांगीतले. सध्या जिल्हयातील धान पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसुन येत असून त्यामुळे मोठया प्रमाणात पीकांची हानी झाली आहे.त्याकरीता शेतकºयांनी पिक विमा योजनेअंतर्गत संबंधित तालुका कृषी विभागाकडे दोन प्रतित अर्ज सादर करावे असे आवाहनही खा.पटोले यांनी केले. विरोधकांकडुन भंडारा जिल्हयातील गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पातुन वगळण्यात आल्याचा अपप्रचार सुरू असुन गोसेखुर्द हा आजही राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि त्याकरीता केंद्र सरकारने निधी दिला असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणर आहे.देशात एकुण ११ राष्ट्रीय प्रकल्प असुन त्यामध्ये गोसे खुर्द या प्रकल्पाचा सुध्दा समावेश असल्याचे खा.पटोले यांनी सांगीतले.गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामात मोठया प्रमाणात अनियमितता आढळुन आल्याने मागील पास ते सहा वर्षापासुन केद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पाला निधी नाकारला होता.मात्र केदं्रीय समितीने गोसे प्रकल्पाचा आढावा घेत राज्य सरकारला गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामामध्ये झालेल्या अनियमितता सुधारण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारने ते दुरूस्त केले आणि त्यामुळेच केंद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पासाठी निधी मंजुर केला असुन २०२०-२१ पर्यंत गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी यावेळी सांगीतले.तुमसर तालुक्यातील बावनथडी योजनेकरीता केंद्राच्या प्रधानमंत्री जलसिंचन योजनेअंतर्गत १७०० कोटी रूपये मंजुर झाले असून बावनथडी प्रकल्प लकवरच पुर्णत्वास येणार असल्याचे खा.पटोले सांगीतले.