24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ आदिवासींच्या समस्यांसंबंधी आदिवासी कल्याण समितीला आदिवासी पीपल फेडरेशनचे निवेदन

आदिवासींच्या समस्यांसंबंधी आदिवासी कल्याण समितीला आदिवासी पीपल फेडरेशनचे निवेदन

0
97

गोंदिया,दि.२८ : आदिवासी कल्याण समिती आज गोंदिया येथे गोंदिया जिल्यातील आदिवासींच्या विविध समस्या जाणून घेण्याकरीता गोंदिया दौऱ्यावर आली असता ऑल  इंडिया आदिवासी पीपल फेडरेशन गोंदियाच्या नेतृत्वात आदिवासी समाजांच्या विविध संघटनांच्या  समूहाने आदिवासी कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आमदार तथा समितीचे अध्यक्ष दौलत  दरोडा यांच्याशी भेट घेत आदिवासी समाज्याच्या ज्वलंत विषय अवगत करण्यात आले. गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल असून पण गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी मुलांमुलींकरिता शासकीय वसतिगृह, आदिवासी समाजाकरिता समाज भवन करीत जमीन उपलब्ध करून देणे,११५०० बोगस आदिवासीना आधिसंख्या पदावरून निष्कासित करून त्वरित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतंत्र ११५०० आदिवासी समाजातून भरण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन  देण्यात आले.
निवेदन देताना आदिवासी पीपल फेडरेशन जिल्हा अध्यक्ष करण टेकाम, संगिता पुसाम महिला फेडरेशन, गोंडवाना मित्र मंडळ अध्यक्ष घनश्याम तोड़साम,  विद्यार्थी संघटेनचे निळकंठ चिचाम माजी नगर प. सदस्य प्रमिला सिन्द्राम, ललिता ताराम,राधिका सलामे सरिता धनबाते, माजी नगर प. सदस्य विनोद पंधरे , दिलेश्वर मडावी सह समाज बांधव उपस्थित होते.

blank