34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत मुंडीपार येथे अनुसूचित जमाती कल्याण समिती शिष्टमंडळाची भेट

ग्रामपंचायत मुंडीपार येथे अनुसूचित जमाती कल्याण समिती शिष्टमंडळाची भेट

0
331

blank

गोरेगाव,दि.३०-तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या शिष्टमंडळाने आज(दि.३०) भेट देत आदिवासी घटक योजनेचा आढावा घेत लाभार्थ्यांना योग्य माहिती दिली जाते की नाही याबद्दल तपासणी केली.समितीतील सदस्यामध्ये सर्वश्री आमदार राजू तोडसाम,श्रीमती मंजुळा गावीत,राजेश पाडवी,हिरामण खोसकर यांचा समावेश होता.
या प्रसंगी गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत, पंचायत समिती गोरेगावच्या सभापती सौ. चित्रलेखा चौधरी, ग्रामपंचायत मुंडीपारच्या सरपंच सौ. प्रेमलता राऊत,उपसरपंच राजाभाई खान, ग्रामपंचायत अधिकारी अरविंद साखरे यांनी मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले.
कार्यक्रमास स्थानिक अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीदरम्यान विविध शासकीय योजना, आदिवासी कल्याणाचे विषय, आणि स्थानिक पातळीवरील गरजांवर चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.ही भेट ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरली.

blank