
- एक डिजीटल उत्क्रांतीची सुरुवात
गोंदिया, दि.30 : भारत सरकारच्या डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे सरकारने ठरविले आहे. यासाठी डाक विभागात IT 2.0 या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्रणालीमुळे डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा ही अचुक, जलद व ग्राहकाभिमुख होईल.
सदर IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी ही दि.4 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्व डाकघरात होणार आहे. याकरीता Data Transfer ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया असते जी दि.2 ऑगस्ट 2025 रोजी केली जाईल. या कारणामुळे नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील डाक विभागाशी संबंधित सर्व कामे ही दि.2 ऑगस्ट 2025 रोजी बंद राहतील.
सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की, त्यांचे डाक विभागाशी संबंधित जी काही तातडीची कामे आहेत ते दि.1 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करुन घ्यावे. दि.2 ऑगस्ट 2025 रोजी ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल डाक विभाग दिलगीरी व्यक्त करते. परंतु ग्राहकांच्याच हितासाठी व त्यांना अचुक, जलद व ग्राहकाभिमुख सेवा मिळावी याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न केले जात आहेत. तरी सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे अ. श्रीनिवास राव, वरिष्ठ डाक अधीक्षक, नागपूर ग्रामीण विभाग, नागपूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.





