गोंदिया,दि.०५ः-राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय कार्यक्रम बहिरेपणा प्रतिबंध आणि नियंत्रणा अंतर्गत दि.22 सप्टेंबर 2025 रोजी “कर्णबधीर लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस” व दि. 22 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान “कर्णबधीर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह” जिल्हास्तरावर साजरा करण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी म्हटले आहे.
दि.22 सप्टेंबर रोजी “कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस” साजरा करण्यात येतो, यामध्ये कर्णबधिर लोकांना भेडसावणाऱ्या आव्हानाबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्यांचे हक्क ओळखणे, सांकेतिक भाषेचे महत्त्व सांगणे आणि सर्व सामान्य लोकांमध्ये लवकर श्रवण कमी होणे हे शोधण्याची गरजच्या दृष्टीकोनातुन सदर “कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह” राबविण्यात येत असल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी म्हटले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासन, के.टी.एस.सामान्य रुग्णालय व राष्ट्रीय कार्यक्रम बहिरेपणा प्रतिबंध आणि नियंत्रण यांच्या एकत्रित सहकार्याने “कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह” अनुशंगाने दि.24 सप्टेंबर रोजी प्रभातफेरी माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले.प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरी द्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक विध्यार्थ्यानी घेऊन फेरीत सहभाग घेतला.
ICMR द्वारे 2022 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील सुमारे ९.९% लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी झाली आहे.त्यापैकी ५१.२% लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आहेत.त्याकरीता दि.22 ते 28 सप्टेंबर, 2025 या कालावधीत “कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह”हा या वर्षी साजरा करण्यात येत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.यावर्षी सदर कार्यक्रमाचे घोषवाक्य “संकेत भाषा हक्काशिवाय मानवी हक्क नाहीत.(“No Human Rights without Sign Language Rights”) असे आहे.
सांकेतिक भाषा जन्मापासून आत्मसात करणे हे संज्ञानात्मक आणि सामाजिकतेसाठी महत्त्वाचे आहे.कर्णबधिर मुलांचा विकास. अनेक कर्णबधिर मुले अशा कुटुंबात जन्माला येतात ज्यांना त्यांच्या राष्ट्रीय सांकेतिक भाषा देखील माहित नाहीत.म्हणून, कुटुंबांना सांकेतिक शिक्षण आणि समर्थन प्रदान करण्यासाठी सेवा असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते त्यांच्या राष्ट्रीय सांकेतिक भाषा शिकू शकतील आणि वापरू शकतील असे ह्या दिवशी जनजागृती करण्यात येत असते.
कर्णबधिर लोकांना भेडसावणाऱ्या आव्हानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी “कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह” साजरा करुन जनजागृती केली जात असल्याची माहीती डॉ.तृप्ती कटरे यांनी यांनी दिली आहे.
प्रभातफेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांनी जनजागृती केली.प्रभातफेरी दरम्यान सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी अरविंदकुमार वाघमारे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती ज़ायस्वाल, नाक-नाक-घसा तज्ञ डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,दंत व मुख तज्ञ डॉ.अनिल आटे,अंसासर्गिक आजार कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी,आय.ई.सी विभागाचे प्रशांत खरात,ऑडीयोमेट्रीक तज्ञ रोशन कुर्वे यांचे समवेत के.टी.एस. सामान्य रुग्णालयाचे इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते.





