24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ निंबा ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियानाला सुरवात

निंबा ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियानाला सुरवात

0
114

गोरेगाव,दि.०६ः तालुक्यातील ग्रामपंचायत निंबा येथे(दि.०५) रविवारला ग्राम पंचायत निंबांतर्गत मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे या उपक्रमात गावातील सार्वजनिक ठिकाणे व मोहल्ला , बोरवेल्स जवळ साफ सफाई व सार्वजनिक स्थळ स्वच्छता करण्यात येत आहेत . ग्राम पंचायत निंबा अंतर्गत मौजा पठाणटोला, पिपरटोला, व निंबा या ठिकाणी श्रमदानातून ग्राम स्वच्छता करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहीम मध्ये प्रामुख्याने पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे ,तंटामुक्ती अध्यक्ष बुधराम बीजेवार,सरपंच वर्षा विजय पटले, उपसरपंच नंदलाल उईके, सदस्य पुरुषोत्तम कटरे ,अंगणवाडी सेविका, मदतनीस ,सीआरपी रजनी पटले,विजय पटले, रंजीत सेऊत , जागेश्वर वाठई, हरिचंद सिरसाम ,प्रेमलाल मसे,कैलास सिरसाम, दीपक मेंढे,व गावातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.
सरपंच वर्षा विजय पटले यांनी सांगितले की, आठवड्यातून एक दिवस एक तास, एक साथ, प्रत्येक नागरिकांनी ह्या स्वच्छता अभियान मोहीम मध्ये सहभाग नोंदवून सहकार्य करावे. तसेच हे श्रमदान फक्त स्वच्छता नाही, तर गावाच्या आरोग्याचे, सौंदर्याचे ,आणि पर्यावरणाचे प्रतीक ठरेल असे मत सुद्धा ग्रामस्थांसमोर व्यक्त केले.