तिरोडा,दि.०६ः स्थानिक शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा येथे वृक्षवेल राज्यस्तरीय साहित्य मंच महाराष्ट्र भारत या समूहाचे राज्यस्तरीय पहिले कवी संम्मेलन उत्साहात संपन्न झाले.संम्मेलनाचे अध्यक्षस्थानी साहित्यरत्न भारत सातपुते हे होते. तर संमेलनाचे उद्घाटक डॉ शैलेंद्र लेंडे मराठी विभाग प्रमुख रा.तु.म.नागपूर विद्यापीठ नागपूर हे होते. प्रमुख आयोजक किशोरकुमार मलेवार अध्यक्ष वृ.रा.सा.मंच म.भा,प्रा.निकेशकुमार मिश्रा,प्रा डी आर गिरिपुंजे, प्राचार्य कमल कापसे,प्रा नरेंद्र पोतदार,जया पवार, रामसागर धावडे संचालक कृषी उ.बा स.,ॲड अशोक मलेवार,डॉ नरेश येरने वै.अ.,कैलास व्यास,साहित्यकार संजय येरने , अमोल थोटे, उपेंद्र रोहनकर जयाताई धावडे,भारती रामटेके, राजू चामट होते.
संमेलनाचे उद्घाटक वृक्षाचे पूजन करून व मान्यवराचे स्वागत वृक्ष देऊन करण्यात आले.संमेलनाची प्रस्तावना कवी किशोरकुमार मलेवार यांनी केली.
तर उद्घाटनीय भाषणात डॉ.शैलेंद्र लेंडे यांनी कविता म्हणजे काय?कविता कशी असावी?याचे स्पष्टीकरण करताना कवितेचे गाजर गवत न होता वृक्षवेल बनावे असे मार्गदर्शन सागितले.भारत सातपुते यांनी जगातील माणूसकिचा नैतिक विकास कवी आणि लेखकामुळे शक्य झाला असे मार्गदर्शन केले.
राज्यस्तरीय कवी संमेलनात कर्तबगार कवी साहित्यिक पदाधिकारी व अधिकारी यांनी उत्कृष्ट कार्यकरिता प्रेरणा मिळावी म्हणून यांना वृक्षवेल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कवी संमेलनात महाराष्ट्र राज्यातील ७९ कवी लेखकांनी सादरीकरण करत सहभाग घेतला आहे. कवी संमेलनाचे संचालन संजय येरने साहित्यकार यांनी केले तर आभार किशोरकुमार मलेवार यांनी मानले.





