चित्रा कापसे/तिरोडा- आठवडाभरापासून मागील आठवडा भर पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे,ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. तिरोडा तालुक्यातील जिल्ह्यातील इतर तालुक्यातप्रमाणे पावसामुळे धान जमीनदोस्त केलेले आहे. यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे वाय टि.कटरे यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात शासकीय कृषी विभागा नुसार १ लाख ९५ हजार हेक्टर वर धानाचे पीक घेतले जाते. त्यातच मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असून सुद्धा अल्पमुदतीचे धानाची पेरणी करतात. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे धान कापुन झाले व कापणीला आलेले आहे.मागील आठवड्यात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी बांधवांनी धान पिकाची कापणी केली ,परंतु वारंवारच्या अवकाळी पावसाने अनेक शेतकरी बांधवांनी धनाची कापणी केलेली नाही तो धान शेतात तसाच पडून खराब होत आहे. तर काही कापलेला धान सुद्धा खराब झालेला आहे तर दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी यंत्रांनी कापणी करतात. परंतु त्यांना दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवावे लागतात. शेतकरी बांधवांनी मोकळ्या जागेवर धान टाकला तो सुद्धा ओला होऊन त्याला अंकुर निघत आहेत. तर अनेकांच्या कापलेल्या धानाच्या कडपा शेतात पडून आहेत. जो धान उभा आहे तोही जमिनदोस्त होऊन सडत आहे व ज्या धानाची कापणी व चुरणी झाली तोही खराब अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतीचे पंचनामे करण्याकरिता उशीर होणार असल्याने. पंचनामे न करता सरसकट मदत देण्याची मागणी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे वाय.टि.कटरे यांनी शासनाकडे केली आहे.





