वडसा-महिलांमध्ये सामाजिक एकोपा संस्कृतीत जाणीव आणि आपुलकी वाढविण्याच्या उद्देशाने वडसा येथे 16 जानेवारी 2026 शुक्रवारला जैन कलार समाज महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन. गजानन मंदिर माता वॉर्ड देसाईगंज येथे करण्यात आले .परंपरेनुसार वान देऊन सौभाग्याचा आशीर्वाद घेण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती झोडे, व श्रीमती अलामे उपस्थित होत्या शारदा स्तवन .झोडे मॅडम आणि स्वागत गीत माया डांगे यांनी सादर केले.
जैन कलार समाज तर्फे नवनिर्वाचित नगरसेविका सौ.मंदाताई समर्थ यांचा सुनंदा खेडीकर यांनी शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विविध स्पर्धा व छोट्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात मैत्विक मुरकुटे याला प्रथम पारितोषिक देण्यात आले. व द्वितीय पारितोषिक चाहूल फटिंग हिला देण्यात आले .तसेच महिलांच्या सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात आचल समर्थ, साक्षी खेडेकर यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला व द्वितीय पुरस्कार केतना शेंडे हिला देण्यात आले .आणि.
तसेच संगीत खुर्ची प्रथम क्रमांक शैला भंडारकर. हंडी फोड स्पर्धा प्रथम क्रमांक रोशनी बनपूरकर,ताली खाली गेम , प्रथम पुरस्कार रजनी भांडारकर, माहेर सासर प्रथम पुरस्कार रोशनी शिवणकर . धावणे स्पर्धा शिवानी शेगावकर सर्व महिलांनी कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सायंकाळी सर्व समाज बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिताताई दहीकर संचालन स्नेहा हरडे व आभार प्रदर्शन केतना शेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन कलार समाजातील महिलांनी खूप मोलाचे सहकार्य केले. असे सहकार्य वारंवार करत राहावे असे आव्हान स्मिताताई दहीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले.





