गोंदिया,दि.२०ः जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खुर्शीपार ग्रामपंचायतीच्या सरपंचा हेमलताबाई रमेश चव्हाण यांच्याविरुध्द ग्रामपंचायत सदस्यांनी सादर अविश्वास प्रस्ताव तहसिलदाराकंडे सादर केला होता.त्यानुसार १९ जानेवारी २०२६ रोजी तहसिलदार आमगाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामपंचायत सभेत ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याने अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने मतदान केल्याने सरपंच हेमलताबाई चव्हाण यांचे सरपंच पद गेले आहे.आता येत्या ७ दिवसात ग्रामसभेत या अविश्वास प्रस्तावाला मंजुरी घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम (३४)१नुसार सरपंच पदाचे अधिकार रद्द झाले आहेत.सरपंचावरील अविश्वास ठराव पारीत झाल्याने खुर्शीपारच्या नागरिकांत आनंद दिसून येत आहे.





