25.8 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ धाड सत्रात कामगार विभागाला यश;बालकामगाराची झाली सुटका

धाड सत्रात कामगार विभागाला यश;बालकामगाराची झाली सुटका

0
50

गोंदिया, दि.21 : मंगळवारी गोंदिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन बालमजुराची सुटका करण्यात कामगार विभागाला यश मिळाले. 13 वर्षीय मुलगा एका गृह उद्योगमध्ये मजुरी करीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन,  सहाय्यक कामगार  आयुक्त गोंदिया यांच्या संयुक्तरित्या निरीक्षण केल्यानंतर अपर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्या आदेशान्वये बालकाची बालमजुरीतून मुक्तता करण्यात आली. तसेच मालकावर पोलीस स्टेशन गोंदिया येथे (बी.एन.एस. 2023) 146 बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 कलम क्रमांक 75 आणि 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्यक्षात ही कारवाई दुकाने निरीक्षक पवन रोकडे, श्रीमती मंगला मसराम व इतर यांनी केली.

blank