23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ चिचगड पोलिस स्टेशन अंतर्गत आलेवाडा येथे रस्ता सुरक्षा अभियान

चिचगड पोलिस स्टेशन अंतर्गत आलेवाडा येथे रस्ता सुरक्षा अभियान

0
177

देवरी, दि. २३ – चिचगड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आलेवाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या मंगळवारी (दि.२०) रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एका जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिचगड पोलिस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक जितेंद्र श्रीराम वासनिक. प्राचार्य व्ही झेड गिऱ्हेपुंजे. पो.हवा, नितीन शिरपूरकर सोहन कोरेटी, शइपाई दिलीप भिसे, सहायक फौजदार हिरासिंग कनपुरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्ददर्शन करताना वाहतुकीच्या नियमाबाबत माहिती देऊन मोबाईलचे दुष्परिणाम, तसेच रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिृली.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सर्व शालेय कर्मचारी आणि पोलिस स्टेशन चिचगडच्या कर्मचाऱ्यांनी  सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

blank